पुणे प्राईम न्यूज: शक्ती कपूर बॉलीवूडमधील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांनी आपल्या नकारात्मक व्यक्तिरेखेने लोकांना आश्चर्यचकित केले. शक्ती कपूर यांच्या नकारात्मक व्यक्तिरेखेमुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये भीती होती. शक्ती कपूर यांनी एफटीआयआयमधून शिक्षण घेतले आहे. जिथे मिथुन चक्रवर्ती त्यांचे सिनिअर होते. मिथुन चक्रवर्तीबद्दल शक्ती कपूर यांनी एक खुलासा केला आहे. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितले आहे की, मिथुन चक्रवर्ती आणि त्यांच्या मित्रांनी त्यांची रॅगिंग केली होती. एवढेच नाही, तर त्याचे केस कापून रात्री खोलीत कोंडून ठेवले होते.
टाइमआउट विथ अंकित या पॉडकास्टमध्ये शक्ती कपूर यांनी दिल्ली ते पुणे प्रवास करताना रवि वर्मन आणि अनिल वर्मन यांना कसे भेटले ते सांगितले. विनोद खन्ना यांच्या कुटुंबात रवीच्या बहिणीचे लग्न झाल्यावर ते त्यांच्या मुंबईतील घरी गेले. त्यावेळी ते विनोद खन्ना, राकेश रोशन आणि राजेश रोशन यांच्यासोबत पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते.
मिथुन चक्रवर्ती यांनी केली शक्ती कपूर यांची रॅगिंग
शक्ती कपूर यांना सोडण्यासाठी राकेश रोशन हॉस्टेलमध्ये गेले होते. हॉस्टेलमध्ये शिरल्यावर त्याला एक माणूस काम करताना दिसला. ती व्यक्ती होती मिथुन चक्रवर्ती. त्यांनी स्वतःची ओळख राकेश यांना करून दिली आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला. जेव्हा शक्ती कपूर यांनी मिथुन यांना विचारले की, तुला बिअर हवी आहे का? त्यांनी नकार दिला. शक्ती कपूरने पुढे सांगितले की, जेव्हा राकेश आणि प्रमोद खन्ना निघून गेले, तेव्हा मिथुनने त्यांचे केस पकडत ते सिनिअर असल्याचे सांगितले. त्यानंतर शक्ती कपूर यांना खोलीत नेले. खोलीत घेऊन गेल्यावर शक्ती कपूर यांना कोपऱ्यात बसवत त्यांच्या दोन मित्रांना बोलावले.
शक्ती कपूर पुढे म्हणाले की, मिथुन यांनी खोलीतील लाईट्स बंद केले. माझ्यावर स्पॉटलाइट टाकला आणि विचारले तुला बिअर घ्यायला आवडेल का? तिथे मिथुन चक्रवर्ती यांनी शक्ती कपूरचे स्टायलिश केस विचित्र पद्धतीने कापले. त्यानंतर त्यांना स्विमिंग पूलमध्ये टाकण्यात आले. शक्ती कपूर ढसाढसा रडू लागले आणि ते खूप घाबरला होते. त्यानंतर हस्कती कपूर यांनी मिथुन चक्रवर्ती यांची माफीही मागितली होती. यानंतर मिथुन आणि शक्ती यांची चांगली मैत्री झाली. दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांनी बादल, प्यार का कर्ज, दलाल, गुंडा यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे.
हेही वाचा:
मोठी बातमी! पॅलेस्टाईनच्या रॉकेट हल्ल्यांनंतर इस्रायलने केली युद्धाची घोषणा
अजित पवार गटासोबत असणारे बेचाळीसावे आमदार नवाब मलिक? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा