मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला होता. त्याने अभिनेत्याकडे 50 लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी आता मुंबई पोलीसांनी रायपूरमधून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी मंगळवारी सकाळी फैजल खानला त्याच्या घरातून अटक केली.
काही दिवसांपूर्वी फैजान खानच्या एका व्यक्तीने शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या व्यक्तीने जीव वाचवण्याच्या बदल्यात 50 लाख रुपयांची मागणीही केली होती. फैजानने वांद्रे पोलीस ठाण्यात फोन करून शाहरुख खानचा उल्लेख केला होता. हा प्रकार घडताच पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. ही व्यक्ती छत्तीसगडच्या रायपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. मात्र आता मुंबई पोलिसांनी आरोपी फैजान खानला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी मुंबई पोलिसांनी फैजल खानला रायपूर, छत्तीसगड येथून अटक केली. बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानला धमकावल्याप्रकरणी फैजलला अटक करण्यासाठी मुंबई पोलीस पहाटे ट्रान्झिट रिमांड घेऊन रायपूरला पोहोचले. फैजलला मंगळवारी सकाळी 11 वाजताच न्यायालयात हजर केले जाणार आहे.
काय आहे धमकी प्रकरण
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्याने 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता पोलिस ठाण्यात फोन केला. त्याने म्हटले की, शाहरुख याने मला 50 लाख रुपये दिले नाहीत, तर मी त्याला ठार करीन, असे सांगितले. त्यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तीला बोलते ठेवले. त्याचे नाव काय आहे, असे विचारले. मात्र तो व्यक्ती अधिकच हुशार निघाला. शाहरुखला धमकी देणारा व्यक्ती म्हणाला, मी कोण आहे हे तो सांगत नाही, तुम्हाला लिहायचे असेल तर माझे नाव ‘हिंदुस्थानी’ असे लिहा. वांद्रे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा एफआयआर दाखल केला आहे.