पुणे : पिंपरीतील विशाल ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्समध्ये सुरु असलेला ‘हर हर महादेव’चा शो संभाजी ब्रिगेडने बंद पाडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोपावरुन हर हर महादेव या मराठी चित्रपटाला राज्यातून विरोध होत आहे.
त्यातच आता संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीष काळे व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकत्यांनी हातात भगवे झेंडे घेवून थेट पिंपरीतील विशाल ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्समध्ये घोषणाबाजी देत घुसले. आणि चित्रपटगृह रिकामे करत हर हर महादेवचा शो बंद पाडला.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चानेही हर हर महादेव चित्रपटाला विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची चित्रपटांद्वारे अवहेलना होत असल्याने कारवाई करण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वरे करण्यात आली आहे.
या चित्रपटातछत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साथीने गौरवलेला स्वराज्याचा इतिहास ऐतिहासिक चित्रपटांच्या माध्यामातुन चुकीचा इतिहास तोटमोड करुन करुन दाखवला जात आहे. हे बाजारुलोक स्वराज्याचा इतिहासाची बदनामी करत आहेत. हर हर महादेव चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. त्यामुळे सदर चित्रपट चित्रपटगृहात दाखवणे त्वरीत थांबवावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे