Singer Ruksana Bano Dies : पश्चिम ओडिशातील प्रसिद्ध संबलपुरी गायिका रुक्साना बानो यांचे बुधवारी रात्री एम्स भुवनेश्वर येथे उपचारादरम्यान निधन झाले. रुक्साना फक्त 27 वर्षांची होती. गेल्या 15 दिवसांपासून भुवनेश्वरच्या एम्समध्ये रुक्सानाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. रुक्सानाच्या मृत्यू नंतर तिच्या कुटुंबियांनी मात्र, वेगळाच दावा केला आहे.
रुक्सानावर विषप्रयोग झाल्याचं तिच्या कुटुंबाचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रुक्सानाला दुसऱ्या संबलपुरी गायिकेनं स्लो पॉयझन देऊन हळूहळू संपवलं आहे. रुक्साना 15 दिवसांपूर्वी बोलंगीरमध्ये शूटिंगदरम्यान ज्यूस पिऊन आजारी पडली होती. 27 ऑगस्ट रोजी तिला भवानीपटना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारा दरम्यान, रुखसाना हिचं निधन झालं. मात्र, रुक्सानाच्या कुटुंबियांनी केलेल्या या दाव्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
रुक्साना हिच्यावर स्क्रब टायफस (उच्च ताप) आजारावर उपचार सुरू होते. पण बुधवारी रात्री तिचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी घोषित केलं. निधनानंतर कुटुंबिय आरोप करत आहेत. पण निधानाचं अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही.