मुंबई : साऊथ स्टार समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन झालं आहे. तिच्या वडिलांचं नाव जोसेफ प्रभू असं असून त्याचं निधन नेमकं कशामुळे झालेलं आहे, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दु:खद बातमीची माहिती समांथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे दिली. तिने लिहिले, “बाय डॅड, जोपर्यंत आपली पुन्हा भेट होत नाही, तोपर्यंत…” आणि तिने हॉर्ट ब्रेकचा इमोजी शेअर केला आहे.
समंथाचे वडील जोसेफ हे तेलुगू अँग्लो इंडियन होते. तर तिच्या आईचं नाव निनेत्ते प्रभू आहे. समंथाचा जन्म चेन्नईत झाला असून आता तिच्या डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं आहे. याचा तिला धक्का बसला आहे. नुकतंच समांथा ‘सिटाडेल हनी बनी’ सीरिजच्या सक्सेस पार्टीत सहभागी झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच ही दु:खद बातमी समोर आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून सामंथा वैवाहिक आयुष्यात आलेल्या वादळामुळं खचली होती. या काळात आई-वडिलांनी तिला मोठा आधार दिला होता. माझे वडील माझे सगळ्यात मोठे सपोर्ट सिस्टम आहेत, असं ती नेहमी सांगायची. सामान्य कुटुंबातून आलेल्या सामांथानं साऊथमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. करिअरमध्येही तिच्या वडिलांनी तिला मोठा पाठिंबा दिला होता.