मुंबई : बिग बॉसच्या 18 व्या पर्वाची सुरुवात झालेली आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या खास शैलीत बिग बॉस 18 चं सूत्रसंचालन करतो. यात रुबाबदार सलमान भाईजानचा अनोखा स्वॅग प्रेक्षकांना चांगलाच भुरळ घालत आहे.
बिग बॉस हा शो 6 ऑक्टोबरपासून कलर्स टीव्हीवर प्रसारित झाला असून शंभर दिवस काही स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात राहावे लागते. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचे आणि प्रेक्षकांचा दुवा म्हणून काम करणाऱ्या सलमान खान हा बिग बॉसचा सर्वात अधिक मानधन घेणारा चेहरा आहे. मनोरंजन सृष्टीतील एका अहवालानुसार, सलमान खान एका महिन्यासाठी 60 कोटी रुपयांचा मानधन घेणार आहे .
सूत्रांच्या म्हणण्यानुसार हे महिन्याचे एवढे मानधन सलमान खानला या संपूर्ण सीझनसाठी म्हणजेच 15 आठवड्यांसाठी मिळणार आहे. जर हा सीझन मागील सीजन प्रमाणे 15 आठवड्यात चालला तर अभिनेता सलमान खानला जवळपास 250 कोटी रुपये मिळू शकतात, असे बोलले जात आहे.
सलमान खान जवळपास 15 वर्षांपासून टीव्हीच्या सगळ्यात मोठ्या रिअॅलिटी शोचं सुत्रसंचालन करत आहे. खरंतर त्याच्या सुत्रसंचालनाची प्रेक्षकांना इतकी सवय झाली आहे की आता त्याला रिप्लेस करणं कठीण झालं आहे.