मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळी थेट सलमान खानला कॉल न करता मुंबई पोलीसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला आहे. या धमकीत लॉरेन्स बिष्णोईचं नाव समोर आलं आहे.
धमकीत नेमकं काय म्हटलंय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला काल सोमवारी रात्री आलेल्या मेसेजमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ बोलत असल्याचे सांगत त्याने ही धमकी दिली आहे. “अभिनेता सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, नाहीतर पाच कोटी रुपये द्यावे. नाही दिल्यास सलमान खानला जीवे मारू, आमची गॅग आजही सक्रिय आहे.” अशी धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान, अभिनेता सलमान खानला येणा-या धमक्यांचे सत्र अद्यापही सुरुच आहे. मागच्या काही दिवसांत सलमान खानला बिश्नोई टोळीकडून तीन वेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तर याच आठवड्यातील ही दुसरी धमकी आहे. धमकी देणाऱ्याने स्वतःला बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले आहे.
Maharashtra | Actor Salman Khan again received a threat in the name of Lawrence Bishnoi. Mumbai Police Traffic Control has received a threatening message in the name of Lawrence Bishnoi which says, “This is Lawrence Bishnoi’s brother. If Salman Khan wants to stay alive, he should…
— ANI (@ANI) November 5, 2024