जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर येथे झालेल्या ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2024’ या स्पर्धेत रिया सिंघ ही मिस युनिव्हर्स ठरली आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेलानं रियाला विजेतेपदाचा मुकुट घातला. यावेळी उर्वशी रौतेलानं रियाला शुभेच्छा देत तिचं कौतुक केलं.
जयपूरमध्ये रविवारी झालेल्या भव्य सोहळ्यात रियाने बाजी मारली. रियाच्या या विजयामुळे ती आता भारताचे प्रतिनिधित्व मिस युनिव्हर्स 2024 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करणार आहे. पुढील काही महिन्यात होणा-या मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धेत ती भारताचा ताज घालून इतर स्पर्धकांसमोर उभी राहणार आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. आणि संपूर्ण देश तिच्या या प्रवासाला यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देत आहे.
काय म्हणाली रिया सिंघ…?
“आज मी ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2024’चे विजेतेपद जिंकले. यासाठी खरंच मी सर्वांची खूप आभारी आहे. हे यश गाठण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. या स्तरावर पोहोचल्यानंतर मी स्वतःला या मुकुटासाठी योग्य समजते.” तसंच यापूर्वीच्या विजेत्यांकडून मी खूप प्रेरित असल्याचंही रियानं यावेळी बोलतानान सांगितलं.
यावेळी बोलत असताना बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स इंडिया 2015 उर्वशी रौतेला म्हणाली, “सर्व मुलींना जे वाटतंय ते मलाही वाटतंय. विजेती खरंच अप्रतिम आहे.” तसंच मिस युनिव्हर्सच्या जागतिक व्यासपीठावर ती आपल्या देशाचं उत्तम प्रकारे प्रतिनिधित्व करेल. तसेच मला आशा आहे की, यावर्षी पुन्हा एकदा भारताला मिस युनिव्हर्सचा मुकूट मिळेल. सर्व मुली खूप मेहनती आणि खूप सुंदर आहेत.”
View this post on Instagram