मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. पण आता त्याला पूर्णविराम मिळणार असल्याच समजत आहे. कारण लवकरच त्यांचा साखरपुडा होणार असी शक्यता आहे. त्यानंतर लगेच ते लग्न देखील करणार असल्याच्या चर्चा आहेत.
विजय देवरकोंडा अभिनेत्री रश्मिका मंदानाला डेट करत आहे. याची चर्चा अनेक वर्षापासून आहे. मात्र, अद्याप दोघांनी त्यांच्या रिलेशनबद्दल अधिकृतरित्या भाष्य केलेलं नाही. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्या एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात दोघेजण काही लोकांसोबत बसले आहेत. तर, विजय आणि रश्मिका एकमेकांसमोर बसले आहेत. त्याशिवाय, ट्वीटरवर एका चाहत्याने कमेंट केली आहे की, तू आमची नॅशनल क्रश आहे. तुझ्यासारखी पत्नी मला मिळेल, अशी आशा आहे”. या ट्वीटवर प्रतिक्रिया देत रश्मिकाने लिहिलं आहे,”ओह… मी जेव्हा लग्नाचा विचार करेल तेव्हा माझा पतीदेखील असाच विचार करणारा असावा”. असा रश्मिकाने रिप्लाय दिला आहे.
‘गीता गोविंदम’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान विजय आणि रश्मिकाची पहिली भेट झाली होती. तेव्हापासून प्रत्येक सण दोघे एकत्र साजरा करतात. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात रश्मिका आणि विजयचा साखरपुडा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रेम्बो’ या तेलुगू सिनेमाचाही ती भाग असणार आहे. विजयचा ‘खुशी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.