मुंबई : चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) यांच्या बायोपिकसाठी कुठला कलाकार काम करणार, याचं उत्तर खुद्द करण जोहर याने स्पष्ट केलं आहे. तो एका लाईव्ह शोमध्ये त्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता.
करण जोहरने आतापर्यंत कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना, माय नेम इज खान आणि स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
तुमच्या बायोपिकसाठी कोणता अभिनेता योग्य आहे जो तुमची भूमिका साकारू शकेल? यावर करण जोहरने रणवीर सिंग (Ranveer Singh) चे नाव घेतले आहे. यादरम्यान करण जोहर लाईव्ह शोमध्ये असताना त्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता.
करण जोहर म्हणाला, “मला वाटते की, तो रणवीर सिंग आहे कारण तो सतत रंग बदलत असतो.” प्रत्येकाला माहित आहे की रणवीर सिंग त्याच्या फॅशन सेन्समुळे आणि ऑफ कलरमुळे चर्चेत असतो. असेच काहीसे करण जोहरचेही आहे, काहीवेळा तो त्याच्या कपड्यांमुळे ट्रोल देखील होतो.
करण जोहर अनेकदा त्याच्या चित्रपटांमधील भव्य सेट आणि ऐश्वर्य यासाठी ओळखला जातो. सध्या करण जोहर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ च्या शुटींगमध्ये व्यस्त असून या चित्रपटात रणवीर सिंगसोबत आलिया भट्ट दिसणार आहे.