मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर, साऊथची सुपरस्टार साई पल्लवी आणि सनी देओल हे सेलिब्रिटी मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. काही महिन्यांपूर्वी सिनेमाच्या सेटवरील शुटिंगदरम्यानचे काही फोटोही लीक झाले होते. आता ‘रामायण’ सिनेमाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचा पहिला लूक आणि प्रदर्शनाचं वर्षही जाहीर केलं आहे.
‘रामायण’ सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या सिनेमाचं पोस्टर लक्ष वेधून घेणारं आहे. ‘रामायण’ सिनेमाच्या पोस्टरवर बाण दाखविण्यात आला आहे. या पोस्टरमधून सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे. ‘रामायण’ हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. पण, यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे.
नितेश तिवारी यांचे दिग्दर्शन असणाऱ्या या फिल्मचे दोन पार्ट येत्या दिवाळीमध्ये म्हणजेच 2026 च्या दिवाळीत आणि 2027 च्या दिवाळीत दुसरा भाग प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. रणबीर कपूर मागील काही महिन्यांपासून रामायण सिनेमाचं शुटिंग करत आहे. नितेश तिवारीच्या या चित्रपटात तो रामाची भूमिका साकारत आहे. सीतेच्या भूमिकेत साऊथची सुपरस्टार साई पल्लवी दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्त कैकयीची भुमिका साकारताना दिसणार आहे.
View this post on Instagram