Ram Charan News: मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार आणि आरआरआर फेम अभिनेता राम चरणच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. राम चरण व त्याची पत्नी उपासना कामिनेनी पालक झाले आहेत. उपासनाने आज (ता. 20 जून) एका गोंडस मुलीला जन्म दिला. घरी लक्ष्मी आल्यानं दोघेही खुश आहेत. सोमवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लग्नाच्या ११ वर्षांनंतर राम व उपासना आई-बाबा झाले आहेत. ही आनंदाची बातमी समोर आल्यानंतर चाहते राम व उपासनावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तर दुसरीकडे अभिनेते दिजीवी देखी जा झाल्याच्या आनंदात आहेत.(Ram Charan News)
अभिनेता राम चरणच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे.
बॉलिवूड, हॉलिवूड अभिनेते तसेच चाहत्यांकडून राम चरण आणि उपासना यांच्यावर शुभेच्छांचा आणि चिमुकलीवर प्रेम आणि आशिर्वादाचा वर्षाव होत आहे. उपासनाने हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील अपोलो हॉस्टिपटमध्ये मुलीला जन्म दिला. उपासना आणि बाळ या दोघांची प्रकृती उत्तम आहे. रुग्णालयाने मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध करत राम व उपासना एका मुलीचे पालक झाल्याची अधिकृत माहिती दिली. बाळाच्या जन्माच्या काही तास आधी राम चरणने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने संगीतकार काल भैरवने त्यांच्या बाळासाठी बनवलेली एक ट्यून शेअर केली होती. तसेच त्याच्या व उपासनाच्या वतीने काल भैरवचे आभार मानले होते.(Ram Charan News)
दरम्यान, उपासनाने मुलीला जन्म दिल्यानंतर साऊथचे मेगास्टार चिरंजीवी आणि त्यांची पत्नी सुरेखा आता आजी-आजोबा झाले आहेत. सध्या त्यांच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. (Ram Charan News)राम व उपासनाने ५ दिवसांपूर्वीच त्यांच्या लग्नाचा ११ वा वाढदिवस साजरा केला. ११ वर्षांनी दोघांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे.
पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, राम चरण आणि उपासना बाळासह चिरंजीवीच्या घरी शिफ्ट होणार आहेत. आपल्या बाळाला आजी-आजोबांचं प्रेम मिळावं, असं दोघांना वाटतं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
एका मुलाखतीत राम चरणची पत्नी उपासनाला लग्नाच्या ११ वर्षांनंतर आई होण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा उपासना म्हणाली, “मी खूप खुश आहे. आमच्या बाळाच्या स्वागतासाठी आम्ही उत्सुक आहोत. मला जेव्हा आई व्हावसं वाटलं तेव्हा मी आई होण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीवर मी खूप खुश आहे. समाजाला वाटतं म्हणून मी आई होण्याचा निर्णय घेतला नाही. आताची वेळ माझ्यासाठी आणि रामसाठी सगळ्यात चांगली वेळ आहे. आम्ही दोघेही अत्यंत खुश आहोत. आपल्या बाळाची देखभाल करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत,”(Ram Charan News)