चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती सोमवारी (30 सप्टेंबर) रात्री अचानक बिघडली आहे. त्यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटदुखीचा त्रास अचानक वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पत्नी लता यांनी रजनीकांत यांच्या तब्बेतीबाबत ही माहिती दिली आहे.
आज म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी त्यांच्या काही चाचण्या होणार आहेत. असं देखील सांगण्यात येत आहे. रजनीकांत रुग्णालयात आहेत कळताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. सध्या सर्वत्र रजनीकांत यांच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.
याबाबत माहिती देताना चेन्नई पोलिसांनी सांगितले की, पोटात तीव्र दुखू लागल्याने रजनीकांत यांना चेन्नईच्या अपोलो ग्रीम्स रोड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत पत्नी लतादीदींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, घाबरण्याची गरज नाही.
सर्व काही ठीक आहे. रजनीकांत यांची प्रकृती गेल्या काही वर्षांत अनेक वेळा बिघडली आहे. 2016 मध्ये अमेरिकेत किडनी प्रत्यारोपणही झाले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
Actor Rajinikanth hospitalised for severe stomach pain
Read @ANI Story | https://t.co/CswEROvTjW#Rajinikanth #hospitalisation #ApolloHospitals #Chennaipolice pic.twitter.com/T68pLy302G
— ANI Digital (@ani_digital) September 30, 2024