पुणे : प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फँड्री या सिनेमातून घराघरात पोहोचलेले आणि तरूण-तरूणींच्या गळ्यातले ताईत बनलेले जब्या आणि शालू यांची जोडी आता रियल लाईफमध्ये प्रेमात पडल्याची चर्चा सुरु आहे. दिवळीच्या मुहूर्तावर या दोघांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून हळदी अन् लग्नाचे फोटो शेअर केले आहे. जब्या फेम सोमनाथ अवघडे अन् शालू फेम राजेश्वरी खरात यांनी लग्नगाठ बांधल्याचे जोरदार चर्चा सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राजेश्वरी आणि सोमनाथचा हळद लागतानाचा फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दोघंही पाटावर एकमेकांच्या बाजू बाजूला बसलेले दिसत आहे. फोटोमध्ये, राजेश्वरीच्या हातात हिरवा चुडा, डोक्याला मुंडावळ्या आणि पिवळी सिंपल साडी असा लूक अभिनेत्रीचा दिसतोय. तर सोमनाथने व्हाईट कलरचा कुर्ता आणि पायजमा, डोक्यावर टोपी, अंगावर शाल आणि मुंडावळ्या बांधल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. हळदीचे आणि लग्नाचे फोटो राजेश्वरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
“शूटिंग आहे मित्रांनो! लाईक Views साठी ती मुद्दाम सांगत नाहीये”, “डायरेक्टर गरीब आहे वाटतं जब्याला चप्पल पण नाही दिली नीट”, “खरंच लग्न झालंय का?”, “मित्रांनो हा Fandry 2 चा शॉट आहे ज्यात त्यांचं लग्न होणार आहे… हा सिनेमा 2025 ला प्रदर्शित होणार आहे.”, “शूटिंगचे फोटो आहेत”, “अरे बाबा आम्हाला वेड्यात काढू नका. खरं आहे की खोटं सांगून टाका एकदा” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या फोटोवर केल्या आहेत.
दरम्यान दोन्हीही कलाकारांनी नात्यात असल्याची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही आहे. ही निव्वळ सोशल मिडियावर चर्चा आहे.