मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) व राज कुंद्राच्या (Raj Kundra) मालकीची ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने गुरुवारी जप्त केली आहे. ६६०० कोटी रुपयांच्या पॉन्झी (Ponzi) घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) ही कारवाई केलीय. सध्या याबाबत राज कुंद्राने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलेली स्टोरी चर्चेत आली आहे.
शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांचा पुण्यातील बंगला आणि इक्विटी शेअर्ससह ९८ कोटींची मालमत्ता जप्त केलीय. हे प्रकरण बिटकॉइनच्या वापराद्वारे गुंतवणूकदारांची त्यांच्या पैशाची फसवणूक करण्याशी संबंधित आहे. याचदरम्यान आता राज कुंद्राच्या इन्स्टाग्राम स्टोरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
राज कुंद्राने सोशल मीडियावर डरकाळी फोडणा-या सिंहाचा फोटो शेअर केला आहे, त्यावर “जेव्हा तुम्हाला अपमानित वाटत असते, तेव्हा शांत राहायला शिकणे ही वेगळ्या प्रकारची आपली प्रगती आहे,” असे त्या फोटोवर लिहिले आहे. ईडीने केलेल्या कारवाईसंदर्भात अद्याप शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने कोणतेही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण राजच्या या इन्स्टाग्राम स्टोरीची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.