Anant -Radhika Wedding : अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांचा हळदी समारंभ सोमवारी (8 जुलै रोजी) अँटिलियामध्ये पार पडला. त्यांच्या हळदी समारंभाला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी हळदी समारंभात सगळ्यांनीच खास लूक केले होते. परंतु, या सगळ्यांमध्ये राधिका मर्चेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. राधिकाने हळदीसाठी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अनामिका खन्नाने डिझाइन केलेला पिवळा रंगाचा सुंदर असा लेहेंगा परिधान केला होता.
राधिका हळदी समारंभातील लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. राधिकाने या ड्रेसवर सुंदर अशी ताज्या फुलांनी सजवलेली ओढणी घेतली होती. ही संपूर्ण ओढणी तगर आणि 90 हून अधिक झेंडूच्या फुलांनी तयार केली होती. यावर तिने फुलांनी घडवलेले दागिने घातले होते. राधिकाच्या या हटके लूकची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. हळदीच्या कार्यक्रमात फुलांच्या दागिन्यांनी राधिका नववधूच्या वेशात सजलेली दिसून आली.. साधा मेकअप, न्यूड शेडची लिपस्टिक, असा राधिकाचा लुक खुपच खास दिसत होता.
दरम्यान, येत्या 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. यावेळी देशभरातील नामवंत व्यक्ती, उद्योजक, सेलिब्रिटी या विवाहासाठी उपस्थित राहणार आहेत.