मुंबई : साऊथ स्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. वीकेंड असो किंवा इतर दिवस, चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनच्या अटकेनंतरही ‘पुष्पा 2’ च्या प्रेक्षकांमध्ये 70 टक्क्याने वाढ झाली आहे.
‘पुष्पा 2’ जागतिक बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या ॲक्शन थ्रिलरनं आतापर्यंत जगभरात 1400 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे, जेव्हा तुम्ही त्याचं यूएस डॉलरमध्ये रूपांतर करता तेव्हा ते 16 दशलक्ष डॉलर होतात. ‘पुष्पा 2’ चित्रपट दिग्दर्शित आहे. ‘पुष्पा 2’ आता लवकरच ‘बाहुबली 2’ चा रेकॉर्ड मोडणार आहे. ‘बाहुबली2’ चित्रपटाने जगभरात 1,810.60 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणा-या पॅन इंडिया चित्रपटाच्या यादीत टॉप 5 मध्ये येतो. आता हा चित्रपट अजून किती रेकॉर्ड ब्रेक करणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
दरम्यान, ‘पुष्पा 2’ सिनेमात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. चाहत्यांना या चित्रपटाचं वेड लागलं असून या सिनेमाला पहिल्या भागापासून ते दुसऱ्या भागापर्यंत प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे.