मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने 2018 मध्ये अमेरिकन गायक आणि अभिनेता निक जोनाससोबत लग्न केले. या लग्नानंतर भारतातील लोकांनी या गायकाला ‘राष्ट्रीय जिजू’ हा टॅग दिला. यानंतर निक जोनासला भारतातच नाही तर परदेशात होणाऱ्या कॉन्सर्टमध्येही ‘नॅशनल जीजू’ म्हणून संबोधलं जाऊ लागलं.
सध्या सर्वत्र फक्त निक याने जीजू या शब्दावर केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीत निक याला, ‘तुला जीजू असे का म्हटले जाते आणि यावर तुझ्या काय भावना आहेत?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर निक म्हणाला, ‘सर्वांना माहिती आहे माझे लग्न प्रियांका चोप्रा हिच्यासोबत झाले आहे. आमच्या लग्नानंतर मला प्रत्येकाने मला जीजू असे म्हणायला सुरुवात केली आणि मी नॅशनल जीजू झालो आहे.
जीजू शब्दाचा अर्थ सांगत निक म्हणाला, ‘जीजू शब्दाचा अर्थ आहे मोठ्या बहिणीचा पती… याच नात्याने मी भारताचा मोठा भाऊ आहे, असेही निक म्हणाला. अनेक शोमध्ये देखील निक याचा उल्लेख ‘नॅशनल जीजू’ म्हणून केला जातो. अमेरिकेतील एका टॉक शोमध्ये निक याने जीजू शब्दाचा अर्थ सांगत ‘मी भारताचा मोठा भाऊ आहे, असे म्हणाला.
निक आणि प्रियांका यांनी जेधपूर याठिकाणी मोठ्या शाही थाटात लग्न केले. लग्नानंतर प्रियांका पतीसोबत परदेशात स्थायिक झाली.