Priya Bapatla News : मुंबई : कितीतरी असे अभिनेते, अभिनेत्री आहेत की त्यांनी त्यांच्या बालपणीचा किस्सा शेअर केला. त्यात मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेल्या प्रिया बापट हिने देखील आपला एक किस्सा सर्वांसमोर शेअर केला. प्रिया बापटने एका मुलाखतीत तिचा बालपणीची आठवण सांगितली. घरातील नियम मोडला म्हणून तिच्या आईने तिला शिक्षा दिल्याचे तिने सांगितले.(Priya Bapatla News)
प्रिया बापट हिने देखील आपला एक किस्सा सर्वांसमोर शेअर केला.
एका युट्यूब चॅनेलला प्रिया बापट हिने मुलाखत दिली. त्यात तिने तिच्या बालपणींच्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये तिने म्हटले की, ‘आम्ही लहानपणी आमच्या घरासमोरील चौकात खेळायचो. सगळीच मुलं तिथे खेळायला यायची.(Priya Bapatla News) तेव्हा आईने घालून दिलेला नियम होता की, संध्याकाळी साडेसात वाजले की आपापल्या घरी जायचं आणि हातपाय धुवून, देवापुढे प्रार्थना म्हणून 8 वाजता जेवायला बसायचं. हे सगळं ठरलेलं होतं’.
पण एकदा घरी जायला मला उशीर झाला तेव्हा आईने आम्हाला घरात न घेता दाराबाहेरच उभं केलं. तर शिक्षा म्हणून दाराला कडीही लावली. त्यात आईने ओरडून म्हटले की, ‘मी तुम्हाला घरी चला असे म्हणाले होते ना…पण तुम्ही आला नाहीत…आता बाहेरच राहा…’ पण नंतर बऱ्याच वेळाने आईने कसंतरी घरात घेतलं.(Priya Bapatla News)