मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने त्यांच्या प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. हे पुरस्कार भारतीय चित्रपट उद्योगातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जातात्त. या पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे. पुरस्कारांचे वितरण २५ एप्रिल २०२५ रोजी मुंबईतील एनएससीआय डोम येथे एका भव्य समारंभात होणार आहे. दरम्यान, हे पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात येणार आहे. याबद्दलची अधिक माहिती समोर आलेली नाही.
चला तर जाणून घेऊया, संपूर्ण माहिती
प्रसिद्ध मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यांना 10 लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि चांदीचे पदक देण्यात येणार आहे.
ज्येष्ठ मराठी गझल गायिक यांना भीमराव पांचाळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला असून १० लाख रुपये रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र, शाल इत्यादी देण्यात येणार आहे.
लोकप्रिय मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार देण्यात येणार असून ६ लाख रु. रोख रक्कम, मानपत्र, स्मृतिचिन्ह, चांदीचे पदक इत्यादी देण्यात येणार आहे.
अभिनेता अनुपम खेर यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरूप १० लाख रु. रोख रक्कम, मानपत्र, स्मृतिचिन्ह, चांदीचे पदक देण्यात येणार आहे.
स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री काजोल देवगण हिला देण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरूप म्हणून ६ लाख रु. रोख रक्कम, मानपत्र, स्मृतिचिन्ह, चांदीचे पदक देण्यात येणार आहे. भारतीय चित्रपट उद्योगातील या व्यक्तींच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार दिला जातो आणि हा समारंभ चित्रपटसृष्टीचा मानाचा उत्सव सोहळा असतो.