पुणे प्राईम न्यूज डेस्क: ‘मु.पो. बोंबीलवाडी’ या १ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित चित्रपटात ज्येष्ठ व लोकप्रिय रंगकर्मी प्रशांत दामले हे हिटलरच्या भूमिकेत आहेत. राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या परेश मोकाशी यांचा हा चित्रपट असल्याने रसिकांमध्ये जी उत्कंठा लागून राहिली आहे, ती आता दुपटीने वाढली आहे. हिटलरचे पात्र कोणी साकारावे, यासाठी प्रेक्षकांचा कल घेण्यात आला.
त्याशिवाय वैभव मांगले, प्रणव रावराणे, मनमीत पेम, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर यांचीही नावे या स्पर्धेत पुढे होती. मात्र अंतिमतः शिक्कामोर्तब झाले ते, प्रशांत दामले यांच्या नावावर. कोण होणार हिटलर ? या प्रश्नावरील पडदा परेश मोकाशी, निमार्ते मधुगंधा कुलकर्णी आणि विवेक फिल्मस, मयसभा करमणूक मंडळी यांनी उघडला आहे.