Munawwar Rana Passed Away : शब्दांचे जादूगार, लोकप्रिय उर्दू कवी मुनव्वर राणा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या ७१ व्या वर्षी लखनौच्या पीजीआय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी रात्री उशीरा लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात त्यांची प्राणज्योज मालवली. मुनव्वर राणा यांची गेल्या काही दिवसांपासून ताब्यात ठीक नव्हती. लखनौ येथील पीजीआय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुनव्वर यांना किडनीचाही आजार होता. यामुळे त्यांना याआधीदेखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मुनव्वर यांची मुलगी सुमैयाने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, मुनव्वर यांचं निधन झाल असून त्यांच्या पार्थिवावर सोमवारी १५ जानेवारी २०२४ रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. मुनव्वर यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. मुनव्वर यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1952 रोजी उत्तर प्रदेशातील रायबरेली याठिकाणी झाला होता.
Acclaimed poet Munawwar Rana dies following prolonged illness in Lucknow. He was admitted to the Sanjay Gandhi Post Graduate Institute of Medical Sciences (SGPGIMS). pic.twitter.com/JD4gjoy61t
— ANI (@ANI) January 14, 2024
मुनव्वर राणा कोण होते?
मुनव्वर राणा हे लोकप्रिय उर्दू कवी आणि लेखक होते. उत्तर प्रदेशात त्यांचा जन्म झाला. मुनव्वर यांना २०१४ मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘शाहदाबा’ या कवितेसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. वेगळ्या लेखनशैलीमुळे त्यांच्या गझलाही लोकप्रिय झाल्या आहेत. मुनव्वर यांना उर्दू साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. पण त्यानंतर वर्षभरात त्यांनी हा पुरस्कार परत केला. देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे राज्य प्रायोजित सांप्रदायिकतेमुळे पुन्हा कधीही सरकारी पुरस्कार स्वीकारणार नाही, असं त्यांनी वचन दिले. लागला होता.