मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे ही जिवंत आहे. खुद्द पूनम पांडे हीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. काल सकाळीच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या मृत्यूबाबत पोस्ट लिहिण्यात आली होती. त्यामुळे ती पोस्ट खोटी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
याशिवाय सोशल मीडियावर लाइव्ह येऊन सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. सध्या तिचा व्हिडीओ समोर आला आहे. “मी जिवंत आहे. माझं निधन सर्वाइकल कॅन्सरने झालेलं नाही. दुर्दैवाने मी त्या हजारो महिलांबद्दल हे बोलू शकत नाही, ज्यांनी सर्वाइकल कॅन्सरमुळे आपले प्राण गमावले आहेत. ते या आजाराविषयी काही करू शकत नाही, असा प्रश्न नाही. पण नेमकं काय करावं हेच त्यांना माहीत नाही,” असं ती या व्हिडीओत म्हणाली.
सर्वाइकल कॅन्सरने पूनमचं गुरुवारी रात्री निधन झाल्याचे म्हटले गेले होते. या पोस्टने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा घडवून आणली. अनेकांनी पूनमच्या निधनाबद्दल आणि सर्वाइकल कॅन्सरबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर आता पूनमचा व्हिडीओ समोर आला आहे.
“मी तुम्हाला इथे हेच सांगण्यासाठी आले आहे की, इतर कॅन्सर हे रोखू शकता येतात. हा कॅन्सरच्या इतर प्रकारांसारखा नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त टेस्ट करावी लागेल आणि एचपीव्ही (HPV) व्हॅक्सिन घ्यावी लागेल. सर्वाइकल कॅन्सरने आणखी कोणाचे प्राण जाऊ नये म्हणून आपण एवढे आणि यापेक्षा अधिक प्रयत्न नक्कीच करू शकतो,” असे पूनम या व्हिडीओत पुढे म्हणाली.