Pankaj Udhas : आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे प्रसिद्ध भारतीय गझल गायक पंकज उधास याचं दीर्घ आजाराने आज निधन झालं. ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबाबतची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पंकज उधास हे एक भारतीय गझल आणि पार्श्वगायक होते, जे हिंदी चित्रपट आणि भारतीय पॉपमधील त्यांच्या कामांसाठी ओळखले गेले. १९८० मध्ये ‘आहट’ नावाच्या गझल अल्बमच्या रिलीजने त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
त्यानंतर १९८१ मध्ये मुकरार, १९८२ मध्ये तरन्नम, १९८३ मध्ये मेहफिल, १९८४ मध्ये रॉयल अल्बर्ट हॉल येथे पंकज उधास लाइव्ह, १९८४ मध्ये नयाब आणि १९८८ मध्ये फ्री असे अनेक हिट गाणे रेकॉर्ड केले. १९८६ मध्ये आलेल्या ‘नाम’ चित्रपटातील “चिठ्ठी आयी है” गाण्याने उधास यांना आणखी प्रसिद्धी मिळवून दिली.२००६ मध्ये त्यांना पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.