(Oscars Award) पुणे : एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ य गाण्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात इतिहास रचला आहे.
पहिला भारतीय चित्रपट ठरला…
बेस्ट ओरिजिनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं) विभागात ऑस्कर ( Oscars Award )पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.
या विभागात ‘RRR’मधील ‘नाटू नाटू’सोबतच ‘टेल इट लाइक अ वुमन’मधील ‘अप्लाऊज’,‘टॉप गन : मॅवरिक’मधील ‘होल्ड माय हँड’, ‘ब्लॅक पँथर : वकांडा फॉरेव्हर’मधील ‘लिफ्ट मी अप’ आणि ‘एवरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स’मधील ‘दिस इज अ लाइफ’ या गाण्यांना नामांकनं मिळाली होती.
अँड ऑस्कर गोज टू….हे वाक्य उच्चारलं गेलं आणि समस्त भारतीयांच्या हदयाची धडधड वाढली होती. काय होणार, नाटू नाटू ला ऑस्कर मिळणार का, गेल्या काही महिन्यांपासून ज्याकडे सगळे लक्ष ठेवून होते तो क्षण अखेर समीप आला आणि त्या क्षणानं साऱ्यांना आनंदित करुन टाकले. आरआरआऱच्या टीमनं जेव्हा तो ऑस्कर स्विकारला त्यावेळच्या मुद्रा खूप काही सांगून जाणाऱ्या होत्या. त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सुचत नव्हते.
२८ फेब्रुवारी रोजी अकादमीने नाटू नाटूच्या नॉमिनेशन संदर्भात ट्विट करत यादसंदर्भात घोषणा केली होती. ऑस्कर सोहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्याचं लाइव्ह सादरीकरण केलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. “राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव ‘नाटू नाटू’ ९५ व्या अकादमी पुरस्कारात लाइव्ह,” असं या ट्विट मध्ये म्हटलं होतं.
दरम्यान, याआधी नाटू नाटू गाण्याने प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कारही जिंकला होता. भारतीय सिनेसृष्टीसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ऑस्कर पुरस्कार जिंकण्यासाठी जगभरातील चित्रपटांमध्ये चुरस रंगलेली असते. ‘नाटू नाटू’ हे २०२२ मधील सर्वांत हिट गाण्यांपैकी एक आहे. एम. एम. किरवाणी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं. तर कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज यांनी हे गाणं गायलं आहे. चंद्रबोस यांनी हे गाणं लिहिलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
या; आठवड्यात मनोरंजनाचा डबल धमाका ; OTT वर चित्रपटांसह वेब सीरिजसुद्धा प्रदर्शित होणार
Women’s Day Special : वडूज नगरीत रंगला खेळ पैठणीचा