पुणे : तब्बल 9 वर्षानंतर आता या दुनियादारीचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या चित्रपटाची कथा, चित्रपटातील व्यक्तिरेखा त्यांचे टायलॉग, चित्रपटातील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव यांनी ‘दुनियादारी 2’ प्रदर्शित करणार असल्याची घोषणा केली आहे. संजय जाधव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.या दुसऱ्या भागात नक्की कोण कोण दिसणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिले आहे. 2013 साली प्रदर्शित झालेला दुनियादारी चित्रपट खूप लोकप्रिय झाला. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टातील अनेक विक्रम मोडत नवी ओळख निर्माण केली होती.
जाधव यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओखाली कॅप्शन सुद्धा दिलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, “2013 साली प्रेक्षकांनी ज्या चित्रपटाला भरपूर प्रेम दिलं !तेरी मेरी यारी …चल करू दुनियादारी म्हणत प्रत्यक्षात ते मैत्रीचे क्षण आमच्या सोबत जगले. ते जग , ती मैत्री , ते प्रेम आणि तीच दुनियादारी आता पुन्हा घेऊन आलोत मैत्रीच्या नव्या ढंगात आणि प्रेमाच्या नवीन रंगात. एका नव्या युगाची, नवीन रंगाची न्यु एज ईस्टमन कलर लव्हस्टोरी. तेरी मेरी यारी … आता ‘पुन्हा दुनियादारी’ !!!”
या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे यांनी जबरदस्त भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या अभिनयाचं आजही अनेकजण कौतुक करत असतात.