मुंबई: दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांनी १५ मार्च रोजी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शेअर केलेल्या फोटोंमध्ये हे जोडपे खूप आनंदी दिसत होते. दिल्लीत लग्न साजरे केल्यानंतर क्रिती आणि पुलकित आता मुंबईला परतले आहेत. हे जोडपे विमानतळावर दिसले.
विमानतळावर क्रिती-पुलकित एकत्र दिसले
पुलकितने निळा कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला होता. तर क्रितीने गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता. नवीन नवरी तिच्या लाल बांगड्या, सिंदूर आणि मंगळसूत्रात खूप सुंदर दिसत होती. त्यांच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्याचवेळी तिथे उपस्थित पापाराझी त्यांना लग्नासाठी शुभेच्छा देत होते.
मेहंदी सोहळ्याचे फोटोही समोर
याआधी दोघांनीही त्यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो फॅन्ससोबत शेअर केले होते. फोटोंमध्ये पुलकितने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता, तर वधू गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये दिसत होती. ही छायाचित्रे शेअर करत क्रितीने लिहिले की, “प्रेमाचा रंग असा असतो, आम्ही थक्क झालो.”
या दोघांनी या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कृती आणि पुलकितने काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे, ज्यात ‘पागलपंती’, ‘वीरे की वेडिंग’ आणि ‘तैश’ यांचा समावेश आहे. पुलकित शेवटचा गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘फुक्रे 3’ मध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात यशस्वी ठरला होता. या चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखा खूप आवडली होती.