Naga Chaitanya Sobhita Dhulipala Engagement : अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे. नाग चैतन्यचे वडील, साऊथ स्टार नागार्जुन यांनी या खास सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. समंथा प्रभूसह घटस्फोट घेतल्यानंतर नागा सोभिताला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यावर शिक्कामोर्तब करत या दोघांनी साखरपुडा करत सर्वांनाच आनंदाचा धक्का दिला.
“We are delighted to announce the engagement of our son, Naga Chaitanya, to Sobhita Dhulipala, which took place this morning at 9:42 a.m.!!
We are overjoyed to welcome her into our family.
Congratulations to the happy couple!
Wishing them a lifetime of love and happiness. 💐… pic.twitter.com/buiBGa52lD— Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) August 8, 2024
नागार्जुनने सोशल मीडियावर लिहिले की, ‘आमचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या कुटुंबात तिचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सुखी जोडप्याचे अभिनंदन! त्यांना आयुष्यभर प्रेम आणि आनंद मिळो, अशी शुभेच्छा. देव आशीर्वाद दे! 8.8.8 अनंत प्रेमाची सुरुवात.’
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्यात बऱ्याच दिवसांपासून डेटिंग असल्याच्या बातम्या येत होत्या. समंथा रुथ प्रभूया अभिनेत्री पाहून अभिनेत्याचा घटस्फोट झाल्यानंतर नागा आणि शोभिता हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्यातील प्रेमाच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत हे दोघे अनेकदा एकत्र दिसले. बऱ्याच काळापासून तो व अभिनेत्री सोभिता धुलीपाला डेटिंग करत असल्याच्या चर्चा होत्या.
यावेळी साखरपुड्यासाठी नागा चैतन्य आणि शोभिता यांनी पारंपरीक वेशभूषेला प्राधान्य दिले. फिकट गुलाबी रंगाची साडी आणि केसात अबोली गजरा या पारंपरिक लूकमध्ये शोभिता नटली होती. तर नागार्जुनने व्हाईट कलरचा कुर्ता आणि उपरणं परिधान केले. दोघांचे साखरपुड्याचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.