पुणे प्राईम डेस्क: या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या धमाल शोमध्ये भरपूर हसण्यासाठी सज्ज व्हा. या शोमध्ये हुमा कुरेशी ‘मॅडनेस की मालकीन’ आहे, हर्ष गुजराल या शो चा होस्ट आहे आणि परितोष त्रिपाठी, स्नेहिल दीक्षित मेहरा (बीसी आंटी), गौरव दुबे, केतन सिंह, अंकिता श्रीवास्तव, कुशल बद्रिके, इंदर साहनी आणि हेमांगी कवी यांसारखे विनोद बहाद्दर या शो मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉमेडी अॅक्ट सादर करत आहेत, त्यामुळे वीकएंडच्या तुमच्या वॉच-लिस्ट मध्ये या शोचा समावेश अवश्य करून घ्या. या वीकएंडला मॅडनेसची पातळी आणखी उंचावण्यासाठी या शोमध्ये मुनव्वर फारूकी पहिला गेस्ट म्हणून येणार आहे, जो आपल्या विनोदी ढंगाने तुम्हाला भरपूर हसवेल!
शोचे ओपनर म्हणून प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडीयन हर्ष गुजराल मुनव्वरच्या या आधीच्या परफॉर्मन्सेसची आठवण काढून जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसेल आणि मग हर्ष आणि मुनव्वर दोघे मिळून ‘UP व्हर्सेस डोंगरी’ हा अॅक्ट प्रस्तुत करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. हुमा कुरेशी देखील त्यांच्या या अॅक्टला दाद देताना दिसेल. त्यानंतर, केतन सिंह, कुशल बद्रिके, अंकिता श्रीवास्तव, स्नेहिल मेहरा दीक्षित आणि इंदर साहनी एकत्र मिळून एक ‘अॅनिमल स्पूफ’ सादर करतील, ज्यात चित्रपटांतील काही दृश्ये गंमतीदार पद्धतीने सादर करण्यात येतील. मुनव्वरशी धम्माल संभाषण करून कॉमेडीयन परितोष त्रिपाठी सगळ्यांना हसवेल. इतकेच नाही, तर मुनव्वर आणि परितोष यांच्यातल्या मजेदार शायरी स्पर्धेमुळे फारच रंगत येईल. त्यानंतर मुनव्वरच्या रूपात गौरव अभिनीत ‘स्वयंवर रोस्ट’ धमाल उडवेल. मुनव्वर रिव्हर्स रोस्ट देखील करताना दिसेल, ज्यात तो सगळ्या सहभागींना कोट्या आणि विनोद करून रोस्ट करताना दिसेल.
शो सुरू होत असल्याबाबतचा उत्साह व्यक्त करताना आणि मुनव्वरशी संभाषण केल्याचा अनुभव सांगताना गौरव दुबे म्हणाला, “‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ चा एक भाग असणे हा एक रोमांचक अनुभव आहे. एक टीम म्हणून आम्हा सर्वांचे लक्ष्य गंमतीशीर गॅग्जद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे आहे. ‘मुनव्वर फारूकी’ म्हणून मी जो परफॉर्मन्स दिला, तो आव्हानात्मक होता. त्याची तयारी म्हणून मी त्याच्या स्केचेसचा अभ्यास केला, रियालिटी शोजमधली त्याची उपस्थिती न्याहाळली आणि हर्ष गुजरालचा देखील सल्ला घेतला, कारण त्याने मुनव्वरसोबत काम केले आहे. या प्रक्रियेतले प्रत्येक पाऊल मोजून मापून टाकले होते, जेणेकरून मुनव्वरची खासियत गंमतीशीर पद्धतीने साकार व्हावी! मला आशा आहे की, आम्ही येथे जे सादर करत आहोत, ते प्रेक्षकांना आवडते आहे.”