हैद्राबाद : बिग बी अर्थात अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ (Projekt K) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हैदराबादमध्ये जखमी झाले आहेत.
हैद्राबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ (Projekt K) चित्रपटाचे शूटिंग चालू होते. या चित्रपटातील एका अॅक्शन सीक्वेन्समध्ये अमिताभ जखमी झाले असून त्यांच्या उजव्या बरगडीचे स्नायू फाटले आहेत. दुखापत झाल्यामुळे त्यांना शूट रद्द करावे लागले. आता दुखापतीतून बरे होण्यासाठी त्यांना काही आठवडे लागणार आहेत. सध्या अमिताभ बच्चन हे त्यांच्या मुंबईतील घरी विश्रांती घेत आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर त्याचे हेल्थ अपडेट शेअर केले आणि सांगितले की, ‘हैदराबाद याठिकाणी शुटिंग सुरु होती तेव्हा ॲक्शन सीन शुट करत असताना मी जखमी झालो आहे. अपघातानंतर शुटिंग रद्द करण्यात आली आहे.
डॉक्टरांनी तपासणी केली आणि हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयातील डॉक्टरांनी सीटी स्कॅन केलं आहे. आता मी घरी परतलो आहे. आता काळजी करण्याचे कारण नाही. पण प्रचंड त्रास झाला. हलण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी देखील त्रास होत होता.