मुंबई – मनोरंजनसृष्टीसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘भाभीजी घरपर है’ मलखान फेम अभिनेता दीपेश भान याचे आकस्मिक निधन झाले आहे.
दीपेश शुक्रवारी (ता. २२ ) रोजी क्रिकेट खेळत होता. खेळताना तो अचानक पडला. त्यांनतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले. अभिनेत्याच्या अशा अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
दीपेशने ‘कॉमेडी का किंग कौन’, ‘कॉमेडी क्लब’, ‘भूतवाला’, ‘एफआयआर’ सोबत ‘चॅम्प’ आणि ‘सुन यार चिल मार’ सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 2007 मध्ये दिपेशनं ‘फालतू उटपटांग चटपटी कहानी’ या चित्रपटातही काम केले होते. यासोबतच तो आमिर खानसोबत टी-20 वर्ल्ड कपच्या जाहिरातीतही दिसला होता. या तरुण अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजनसृष्टी पुन्हा एकदा हादरली आहे.