Mohanlal Admitted To Hospital : दक्षिण भारतातातील सुपरस्टार मोहनलालची तब्येत बिघडली असल्याची बातमी समोर आली आहे. प्रकृतीमध्ये थोडा बदल झाल्याने अभिनेता मोहनलाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अभिनेता मोहनलाल मल्याळम सिनेसृष्टीतील नावाजलेले नाव आहे. त्यांचे चाहते फक्त दक्षिण भारतात नसून संपूर्ण भारतभर पसरले आहे. मोहनलाल यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यासोबतच त्यांना ताप आला असून स्नायू दुखण्याची समस्या सुरु झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने कोचीयेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहनलाल यांना रुग्नालयात दाखल केल्यामुळे चाहते चिंताग्रस्त आहेत.
मोहनलाल नुकतेच गुजरातहून परतले आहेत. मोहनलाल आगामी चित्रपटाचे शुटिंग करत होते. तसेच दिग्दर्शक पदार्पणाच्या ‘बॅरोज’ चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शनचे कामही पूर्ण केले आहे. दिग्दर्शक म्हणून मोहनलाल या त्यांच्या पहिल्या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक होते, परंतु दरम्यानच्या काळात मोहनलाल यांची तब्येत बिघडल्याने एकच चिंता व्यक्त केली जात आहे.
डस्ट्रीट्रॅकर श्रीधर पिल्लई यांनी सोशल मीडियावर मोहनलाल यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे अधिकृत स्टेटमेंटही शेअर केले आहे. सध्या सगळीकडे मोहनलला यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते आतुर आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे की नाही याविषयी चर्चा सुरु आहे. मोहनलाल लवकर बरे होती असा विश्वास डॉक्टरांनी दाखवला आहे.