मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनिल यांनी आज (11 सप्टेंबर 2024) वांद्रे येथे राहत असलेल्या त्यांच्या इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले. ही घटना सकाळी 9 वाजता घडली. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. आता मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अत्यंत मोठी अपडेट दिली आहे. अनिल यांनी आत्महत्या केली नसून ते सहाव्या मजल्यावरील बाल्कनीमधून खाली पडले, असं पोलीस म्हणतायत. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
‘मिड डे’ या वेबसाइटला पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल अरोरा हे बाल्कनीजवळ उभे होते आणि ते अचानक खाली पडले. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अनिल अरोरा हे 80 वर्षांचे होते. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र ते बाल्कनीच्या ग्रिलची उंची कमी असल्याने त्यांचा तोल जाऊन खाली पडले का, याचा तपास पोलीस करत आहेत.
अभिनेत्री मलायका अरोरा ही काही कामानिमित्ताने पुण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच मलायका तातडीने मुंबईसाठी रवाना झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अरोरा कुटुंबातील सदस्यांना धीर देण्यासाठी मलायकाचा पूर्व पती आणि अभिनेता अरबाज खान हा अरोरा यांच्या घरी दाखल झाला आहे.
मलाइका अरोराचे वडील अनिल अरोरा हे भारतीय सैन्याचे माजी अधिकारी होते. त्यांनी भारतीय लष्करात वरिष्ठ अधिकारी म्हणून बराच काळ काम केले होते. मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. त्यांचे कुटुंब भारताच्या सीमेवर वसलेल्या फाजिल्का येथे राहायचे. अनिल अरोरा यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये काम केले होते.
#WATCH | Maharashtra | Anil Arora, father of actress-model Malaika Arora died by suicide by jumping off the terrace of their residence in Mumbai. Police team is present at the spot and is carrying out investigation. Details awaited. pic.twitter.com/QKBDKWOsdI
— ANI (@ANI) September 11, 2024