IFFI 2023 : पुणे : आज सोमवारपासून 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘इफ्फी’ या महोत्सावाला सुरुवात होणार आहे. यंदा या महोत्सवाच महत्त्व आणखी वाढलं आहे. कारण आता या महोत्सवात महेश मांजरेकरांच्या ‘बटरफ्लाय’ या सिनेमाचा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सावाची देशभरातील कलाकारांसोबत परदेशातील फिल्ममेकर्सनाही उत्सुकता आहे.
स्वप्न पूर्ण करण्यासाठी बटरफ्लाय पाहण गरजेच
राज्यातील प्रेक्षकांसह समीक्षकांनी कौतुक केलेला हा चित्रपट प्रत्येकाने पहायला हवा. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी बटरफ्लाय चित्रपट पहायलाच हवा. अशा या ‘बटरफ्लाय’ चित्रपटाचा आस्वाद आता गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाला उपस्थित राहणाऱ्या रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे. गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘फिल्म बाजार ‘ या गटात मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात. या चित्रपटांची निवड करण्याकरता पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय हे तीन चित्रपट निवडण्यात आले आहेत.
एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टि नेते अभिजीत साटम चित्रपटाची निर्माती आणि प्रमुख भूमिका साकारलेली अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम दिग्दर्शिका मीरा वेलणकर आणि ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर आवर्जून उपस्थित राहणार आहेत. मीरा वेलणकर दिग्दर्शित ‘बटरफ्लाय’ या चित्रपटाची निवड या वेळच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडूनकरण्यात आली आहे.