पुणे : लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांनी अजित पवारांची थेट माफी मागितली आहे. आणि म्हणाली, दादा खूप मोठे आहेत. दादांना मी काही बोलू शकत नाही. माझे एकच म्हणणे आहे. मी माफी मागितली होती. माझ्याकडून चुका झाल्या आहेत. तरीही अजूनही लोक मला ट्रोल करीत आहेत. ते कोण आहेत, हे मला माहिती नाही. लोक माझे जुने व्हीडिओ टाकत आहेत. माझी प्रसिद्धी काहींना पहावत नाही, असे गौतमी पाटील म्हणाली.
राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत चार दिवसापूर्वी बैठक पार पडली होती. या बैठकीत सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे यांनी बैठकीत अश्लील कार्यक्रमांचा मुद्दा उपस्थित केला.
यावेळी घाडगे यांनी गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचे आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार केली होती.
मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे करण्यात आली होती. यानंतर अजित पवार यांनी या कलाकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यभरात कुठेही पक्षाच्या कार्यक्रमात किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन न करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत.