मुंबई : सध्या गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात राज्यात सेलिब्रेट केला जात आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर सारख्या महत्त्वाच्या शहरात हा सण अगदी थाटामाटात साजरा केला जातो. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राज्याच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. राजकीय आणि बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटी या दहा दिवसात लालबागच्या राजाचं दर्शन घेतात.
कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री सिमरन बुधरूप हिने नुकतेच लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी अभिनेत्रीने दर्शन घेतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने दोघींसोबत घडलेल्या वर्तवणुकीवर भाष्य केले आहे. अभिनेत्रीने कॅप्शन देत घडलेल्या प्रकारावर भाष्य केले आहे.
सिमरनने या घटनेचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून लालबागचा राजच्या मंडपात असलेल्या बाउंसरने तिच्यासोबत आणि आईसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. या व्हिडिओद्वारे सिमरनने संपूर्ण घटना आणि तिच्यासोबत काय घडले हे तपशीलवार सांगितले आहे. सिमरनने म्हटले की, “मी माझ्या आईसोबत लालबागच्या राजाकडे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो, पण तेथील कर्मचाऱ्यांच्या वर्तवणुकीमुळे आम्हाला वाईट अनुभव आला. माझ्या आईचे फोटो काढत असताना त्या ठिकाणच्या एका व्यक्तीने फोन हिसकावून घेतला असल्याचे सिमरने म्हटले. माझी आई माझ्या मागेच दर्शनासाठी रांगेत होती आणि आम्ही कोणताही जास्त वेळ घेत नव्हतो. आईने पुन्हा फोटो खेचण्याच सुरुवात केली तेव्हा त्यांनी पुन्हा खेचण्याचा प्रयत्न केला.
सिमरने पुढे म्हटले की, या सगळ्या गोंधळात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाउंसरने माझ्या सोबत गैरवर्तवणूक केली. या सगळ्या प्रकाराचे व्हिडीओ रेकोर्डिंग करण्यास सुरुवात केली तेव्हा माझाही फोन हिसकावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांना ज्यावेळी कळले की मी अभिनेत्री आहे, त्यावेळी ते मागे हटले.
सिमरनच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत लालबागचा राजा मंडळाला खडेबोल सुनावले आहेत. हे वर्तन चुकीचं आहे अशा अर्थाच्या कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. तर अनेकांनी त्यांच्याबाबत तिथे घडलेल्या घटनाही शेअर केल्या आहेत.
View this post on Instagram