पुणे प्राईम न्यूज डेस्क: अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी डाएटवर असतात. मात्र, जेव्हाही संधी मिळते तेव्हा ते संधीचा फायदा घेत मिठाई खातात. फोटो शेअर करून काही सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना चॉकलेट खायला किती आवडते याची माहिती दिली आहे. काही सेलिब्रिटींनी स्वतः मुलाखतींमध्ये कबूल केले आहे की, त्यांना चॉकलेट खायला खूप आवडते. आज आम्ही तुम्हाला अशाच सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत.
आलिया भट्ट
आलिया भट्ट अनेक चॉकलेट जाहिरातींमध्येही दिसली आहे. तिला विशिष्ट केक खूप आवडतात. तिचा एक खास केक भारतात उपलब्ध नाही. या केकचे नाव मिल्क केक आहे. लंडनमधील एका खास रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या या केकचे आलियाला वेड लागले आहे. आलिया भट्ट तिच्या डाएटसोबत गोड खाण्यास विसरत नाही.
करीना कपूर खान
बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री करीना कपूर खान खाण्यापिण्याची खूप शौकीन आहे. ती अनेकदा तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर चॉकलेट किंवा केकचे फोटो शेअर करत असते. ती अनेकदा मिठाई खाताना दिसली आहे. मात्र, लग्न आणि दोन मुलांनंतरही करीना झिरो फिगर राखून आहे.
दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोणला गोड पदार्थ खूप आवडतात. सण-उत्सवात तिला फक्त चॉकलेटच नाही तर मिठाईही खायला आवडते. ती अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून मिठाई आणि गोड पदार्थांचे फोटो शेअर करत असते. मात्र, जिम आणि योगा करून स्वत:ला सांभाळण्यावर तिचा विश्वास आहे.
शिल्पा शेट्टी
योगा करणाऱ्या शिल्पा शेट्टीलाही गोड पदार्थ खूप आवडतात. ती अनेकदा तिच्या मुलांसोबत लंच किंवा डिनरसाठी जाते. ती रोज योगा करते आणि काटेकोर डाएटही फॉलो करते. दोन मुलं झाल्यानंतरही तिचा लूक सर्वात अप्रतिम आहे. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.