(Ketaki Chitale) पुणे : अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale ) कोण ओळखत नसावे असे कमीच असतील. अनेकांनी तिचा अभिनय पाहिला किंवा कसे हा संशोधनाच विषय ठरू शकेल. परंतून तिच्या पोस्ट तर नक्कीच पाहिल्या वाचल्या असतीलच. ती सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टीव्ह असते. सध्या तिची एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
केतकी सध्या पुण्यात असून तिने एक व्हिडिओ सोशल माध्यमावर प्रसिध्द केला आहे. त्यात तिना चक्क पुणेकरांची लाज काढली आहे. तसेच स्वत: मावळे समजणाऱ्यांची चांगलीच कानउडणीही केली आहे.
हिंदू नववर्षाच्या निमित्ताने म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. अनेक ठिकाणी राजकीय पक्ष आणि विविध संस्था मोठ्या उत्साहात शोभा यात्रा काढल्या जात आहे. पारंपरिक पोशाख करून रस्त्यावर उतरतात.
पुण्यातही मोठ्या थाटात गुढीपाडवा साजरी केला जातो. अशा पुण्यात सध्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छांची जोरदार बॅनरबाजी केलेली दिसून येत आहे. पण यावेळी हिंदू नववर्षाच्या काही पुणेकरांनी इंग्रजीतून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील लोकांना स्वघोषित मावळे म्हणत अभिनेत्री केतकी चितळेने त्यांना चांगेलच झोडपले आहे.
केतकी व्हिडिओ म्हणते की, ‘नमस्कार मी केतकी चितळे, आता मी आहे पुण्यात.. म्हणजेच स्वघोषित मावळ्यांच्या जन्मभूमीत.. रस्त्यावर चालताना मला बऱ्याच ठिकाणी ‘हॅप्पी गुढी पाडवा’ असे पोस्टर दिसले. त्यामुळे मला या सगळ्या मावळ्यांना विचारायचं आहे की, आता तुम्ही विसरलात का महाराजांना, त्यांच्या शिकवणीला.. ‘
‘की फक्त दादागिरी करताना महाराजांचे नाव वापरुन त्यांचा अपमान करता.. आजही नवीन वर्षांच्या हॅप्पी गुढी पाडवा अशा शुभेच्छा देताना तुम्हाला काहीच वाटत नाही का.. असो.. गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..’ अशा आशयाचा तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Cantonment Board Recruitment : निवडणूक रद्द तर, मग आमचे पैसे परत करा ; इच्छुक उमेदवारांची मागणी!
Breaking News | मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात ; तिघांचा जागेवरच मृत्यू..!