अभिनेत्री केतकी चितळे ही तिच्या अभिनयापेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकवेळा चर्चेत आली आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी गेले असताना केतकीने त्यांच्याशी हुज्जत घातली. विशेष म्हणजे मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. आता #UNIFORNCIMINALम्हणत तिने मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला जाब विचारत केतकी म्हणाली की, “तुम्ही मराठा म्हणजे माझ्यावर अॅट्रॉसिटी टाकणार नाहीत. मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे. संविधान आणि कायदा सर्वांसाठी समान नाही. जातींवर आधारित कायदे बनवले जात आहेत.” यावरून केतकी ट्रोल झाली. अशातच तिने आज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या एका वक्तव्यावर पोस्ट शेअर केली आहे.
मनोज जरांगे पाटील त्यांच्या भाषणामधून म्हणाले होते, “धनगर आणि मुस्लीम बांधवांनी मागणी केल्यास त्यांच्याही आरक्षणासाठी मी लढा देईल. मग बघतो सरकार कसं आरक्षण देत नाही त्यांना.” मनोज जरांगे पाटलांच्या याचं वक्तव्यावर केतकीने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे.
“आता कसे, खरे रूप दिसले. मुखवटा फार काळ टिकत नाही. यांना फूट पाडायची आहे सनातनींमध्ये. आता तरी जागे व्हा.” केतकीची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.