Kaun Banega Crorepati Season 16 : आज 28 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती सीझन 16 या ज्ञान-आधारित गेम शोच्या ‘इंडिया चॅलेंजर वीक’मध्ये आष्टी, महाराष्ट्रहून आलेला कृष्ण सेलुकर सगळ्या प्रतिकूलतांवर मात करत पुढे आलेला दिसणार आहे.
पहिल्यांदाच, 10 प्ले-अलॉन्ग स्पर्धकांपैकी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट फेरीमधील सर्वोच्च 2 स्पर्धक हॉटसीटवर आपली जागा नक्की करण्यासाठी ‘जल्दी 5 बझर राऊंड’मध्ये एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतील. बझर चॅलेंजमधील विजेता पुढे जाईल आणि मनी-ट्री मधल्या थेट 6 व्या प्रश्नाचा सामना करण्यापासून सुरुवात करेल. मागच्या दोन अपयशी प्रयत्नांनंतर कृष्णाच्या चिकाटीचे चीज झाले आणि ‘जल्दी 5 बझर राऊंड’ मधल्या तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी ठरून तो हॉटसीटवर पोहोचला.
‘आपल्या वडिलांना आपला अभिमान वाटावा आणि आयुष्यात आपण मोठे काही तरी साध्य करू शकतो हे दाखवून देण्याचे स्वप्न उराशी घेऊन कृष्ण रियालिटी शोच्या या सीझनमध्ये आला आहे. खेळकर स्वभावाच्या कृष्णाने आपल्या वेधक खेळाने प्रेक्षकांचे मनोरंजन तर केलेच शिवाय, अमिताभ बच्चन यांच्याशी मस्त गप्पा देखील मारल्या, ज्यामध्ये एका छताखाली आठ लोकांनी एकत्र राहण्याचा आगळा वेगळा अनुभव देखील सांगितला.
जालना जिल्ह्यातील आष्टी गावातील 29 वर्षीय कृष्ण गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात एका चॅरिटी होममध्ये राहत आहे. त्याच्या इंजिनियरिंगची पदवी आहे, पण कोव्हिड-19 मुळे त्याची नोकरी सुटली आणि जवळजवळ दोन वर्षे तो बेरोजगार आहे. या कारणामुळे आपल्या वडिलांशी त्याचे नाते तणावपूर्ण झाले आहे. आपल्या आईच्या आणि भावाच्या प्रोत्साहनामुळे MPSC परीक्षा उत्तम प्रकारे पास करून सरकारी नोकरी मिळवायची आणि मगच आपल्या गावात जायचे हे त्याने आपले लक्ष्य बनवले आहे.
कृष्णाने KBC मध्ये सहभागी होण्याचे ठरवले, त्यामागे या शो ची प्रशंसक असणाऱ्या त्याच्या आईचेच प्रोत्साहन आहे. या शो मुळे त्यांचे जीवन पालटून जाऊ शकेल अशी तिला आशा आहे. आता हॉटसीटवर पोहोचलेल्या कृष्णाकडे आपले ज्ञान आणि जिद्द दाखवून आपल्या वडिलांना आपला अभिमान वाटावा असे कर्तृत्व गाजवण्याची संधी आहे.
बिग बींशी गप्पा मारताना हॉस्टेलच्या एका छोट्याश्या खोलीत इतर आठ लोकांसोबत राहण्याचा मजेदार अनुभव कृष्णाने सांगितला. ते ऐकून अमिताभ बच्चन यांना देखील कोलकाता येथील आपला एक अनुभव आठवला. अशावेळी परिस्थिती कठीण असली तरी त्यावेळचा आनंद आणि मैत्री फार सुखद असते, हे त्यांनी नमूद केले. लागून 8 पलंग ठेवलेल्या हॉस्टेलच्या एका खोलीतील आपले जीवन दर्शविणारा कृष्णाचा व्हिडिओ पाहताना अमिताभ बच्चन यांना देखील आठवले की, त्यांच्याकडे त्यावेळी आठ लोकांमध्ये दोनच बेडरूम होत्या, ज्यामुळे सतत काही ना काही गंमतीशीर वाद-विवाद होत असत. ते आपल्या दोन्ही हातांचा वापर करण्याच्या कौशल्याबद्दल देखील बोलतील. बिग बी सांगतील की, आपण डाव्या हाताने लिहीत असल्यामुळे आपले वडील आपल्याला किती टोकत असत. त्यामुळे मग ते उजव्या हाताने लिहू लागले. कृष्णा मात्र अभिमानाने सांगेल की तो दोन्ही हातांनी लिहू शकतो, जे एक दुर्मिळ आणि आकर्षक कौशल्य आहे.
KBC मध्ये येण्याबाबत कृष्ण म्हणतो, “माझ्यासाठी ही संधी खरोखर माझे आयुष्य पालटून टाकणारी, एका उज्ज्वल भविष्याचा मार्ग खुला करणारी आहे, जी माझ्या वैयक्तिक जीवनातील एक मोठा टप्पा दर्शवते. कौन बनेगा करोडपती 16 मधून मिळणारी रक्कम माझ्यासाठी कायापालट करणारी असेल. माझे शिक्षण पुढे घेऊन जाण्यात, माझ्या कुटुंबाला आधार देण्यात आणि माझ्या वडिलांशी माझे नाते सुधारण्यात मला या रकमेचा उपयोग होईल. मी KBC जिंकलो, तर माझ्या कुटुंबासाठी ती एक अर्थपूर्ण भेट असेल. कारण त्यांच्या भक्कम आधारावरच मी इथवर येऊन पोहोचलो आहे. अमिताभ बच्चन यांना भेटल्यावर मला स्वप्न साकार झाल्यासारखे वाटले. वेगवेगळ्या स्तरावर त्यांच्याशी बोलण्याची संधी मला मिळाली यावर अजून माझा विश्वासच बसत नाहीये.”
बघा, कौन बनेगा करोडपती सीझन 16 चा इंडिया चॅलेंजर वीक या सोमवार ते शुक्रवार मध्ये रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!