पुणे : सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाची विजेती कार्तिकी गायकवाड नेहमीच चर्चेत असते. या कार्यक्रमाने कार्तिकाला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले आहे. तिच्या सुमधूर आवाजाने कार्तिकीने श्रोत्यांची मने जिंकली आहेत. 2020 ला तिने रोनित पिसेशी लग्न केले. त्यानंतर आता लग्नाच्या तीन वर्षांनंतर कार्तिकच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.
कार्तिकी-रोनितच्या घरी इवलुशा पावलांनी छोटा पाहुणा आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्तिकीने ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. कार्तिकीने सोशल मीडियावरुन याबाबतची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली.
कार्तिकीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आई झाल्याचे सांगत मुलगा झाल्याची बातमी दिली आहे. चाहत्यांनी कार्तिकीच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
कार्तिकीने पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘माझ्या हाताता इतके कोणाचेही बोट योग्य पद्धतीने मावणार नाही आणि मला हे खूप छान वाटत आहे. माझ्या लहान मुलाचा हात हातात घेताना मला आनंद होत आहे’.
दोन महिन्यांपूर्वी कार्तिकीच्या डोहाळ जेवणाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर कार्तिकीने आपण गरोदर असल्याची बातमी चाहत्यांना दिले होते. त्यानंतर कार्तिकी आई कधी होणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. आज कार्तिकीने आपण आई झाल्याची बातमी चाहत्यांनी दिली.