मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राज कपूर यांची 14 डिसेंबरला 100 वी जयंती आहे. यानिमित्ताने 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत एक सोहळा होणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण देण्यासाठी संपूर्ण कपूर कुटूंब दिल्लीला गेले होते. त्यांनी पंतप्रधान मोदींची खास भेट घेत त्यांना आमंत्रण दिले आहे.
कपूर कुटुंबीय 10 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला पोहोचले. रणबीर कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर, सैफ अली खान, करिष्मा कपूर, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर सहानी, आदर जैन, अनिसा मल्होत्रा हे सर्वजण यावेळी उपस्थित होते. यावेळी मोदींनी संपूर्ण कपूर कुटुंबाबरोबर गप्पा मारल्या. सोशल मीडियावर हे फोटो कपूर कुटूंबाने शेअर केले आहेत.
तसेच पंतप्रधान मोदी यांनी करीना-सैफ यांची मुलं तैमूर आणि जेहसाठी एक खास भेट दिली. त्यांनी एका कागदावर तैमूर आणि जेह यांना ऑटोग्राफ दिला. याचा फोटो करीनानं तिच्या इन्स्टाग्राम आणि स्टोरीवर शेअर केला आहे. दरम्यान, करीना कपूर खान आणि नीतू सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण कपूर कुटुंबातील भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दिल्लीतील या भेटीची फोटोज शेअर करताना करीना कपूरने म्हणाले, “आमचे दिग्गज आजोबा राज कपूर यांचा विलक्षण जीवनप्रवास सिनेमांच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. या खास दिवसाचं आमंत्रण देण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यासाठी मी त्यांची आभारी आहे.”
View this post on Instagram
View this post on Instagram