दिल्ली : बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत नेहमी अभिनयासोबतच तिच्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असते. कंगना बॉलिवूडवर टीका करण्यात नेहमीच पुढे दिसून येते. अशातच आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. आता कंगनाने कपूर परिवाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यावर देखील टिकात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याचसोबत, बॉलिवूड इंडस्ट्री अनाथ असल्यासाचेही तिने म्हटले आहे. राज कपूर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने कपूर कुटुंबाने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यानंतर कंगना रनौतची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाली कंगना रनौत?
एका मुलाखती दरम्यान करताना कंगना रनौत म्हणाली की, मला असे वाटते की बॉलिवूडला मार्गदर्शनाची गरज आहे. आपले पंतप्रधान असो किंवा इतर कोणतेही मार्गदर्शक असो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय असो बॉलिवूडला थोडं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. मी सुद्धा २० वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करत आहे. माझ्या मते हा बॉलीवूडवाले अनाथ आहेत आणि त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांना कुठे गेले पाहिजे कोणाला भेटले पाहिजे याबद्दल काहीच समजत नाही.
तसेच कंगना पुढे म्हणाली की, कोणत्या इव्हन्टमध्ये जास्त पैसे मिळाले की कोणत्याही कार्यक्रमात जाऊन हजेरी लावतात. मग त्या कुप्रसिद्धी असलेल्या दाऊदच्या पार्ट्या असल्यातरी ते तिथे जातात. अनेक वेळा ते हवाला-ड्रग्स प्रकरणात अडकले आहेत. यांना असे वाटते की पंतप्रधानांची भेट घेतली म्हणजे आपले पंतप्रधान आमचे काम पाहत असतील. पंतप्रधानांना आमच्या विषयी माहिती असेल तर नक्कीच आम्ही चांगले काम करत आहोत. पण असं नाही आहे. आमची फक्त इंडस्ट्री मोठी आहे पण तिथे रिस्पेक्टची कमतरता आहे. मी स्वतः पंतप्रधानांना भेटण्याची विनंती केली आहे, लवकरच ते मला भेटणार अशी आशा आहे’ असे कंगना म्हणाली.