पुणे : दाक्षिणात्य ज्येष्ठ अभिनेते कमल हासन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहेत. आपल्या विविध भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे म्हणून कमल हसन यांची ओळख आहे. ते पुन्हा मोठ्या पडदावर लवकरच दिसणार आहेत.
त्याच्या आगामी ‘इंडियन 2’ चित्रपटातील लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
अशा परिस्थितीत आता या चित्रपटातून अभिनेत्याचा नवा लूक समोर आला आहे. ज्यामध्ये तो जुन्या व्यक्तिरेखेमध्ये राजकारण्यासारखा दिसणार आहे. यामध्ये तो पांढरा शर्ट आणि गमछात डॅशिंग स्टाईलमध्ये दिसत आहे.
त्याचा हा लूकही चांगलाच व्हायरल होत आहे. कमल यांचा हा लूक चाहत्यांना चित्रपटासाठी खूप उत्सुक करत आहे. इंडियन 2 हा चित्रपट 9 मे 1996 मध्ये रिलीज झालेल्या इंडियन चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात कमल हासन सोबत काजल अग्रवाल आणि रकुल प्रीत सिंह देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.