सहारनपूर : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) अध्यक्षा मायावतींविरोधात ‘एक्स’वर कथितरीत्या आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी चित्रपट अभिनेता कमाल राशीद खान ऊर्फ केआरके विरोधात उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहमीच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणाऱ्या कमाल खानचे मूळ गाव सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद पोलीस ठाणे हद्दीतील अकबरपूर हे आहे.
या वादग्रस्त पोस्टनंतर सुशील कुमार यांच्या तक्रारीवरून खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कमाल खानच्या सोशल मीडियावरील वक्तव्यामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखवल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. सहारनपूरमध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केआरकेचा भाऊ माजिद अली बसपाचा उमेदवार होता. त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.