Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिसतं तसं नसतं… ‘वाळवी’चा रहस्यमय ट्रेलर प्रदर्शित….!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 4 January 2023, 17:16

मुंबई : ‘वाळवी’ हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ती, लाकूड पोखरणारी किड. एवढं नुकसान करणारी हीच वाळवी जर एखाद्या नात्याला लागली तर? अशीच नात्याला लागलेली वाळवी आपल्याला परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यापूर्वीच या चित्रपटाचे जबरदस्त टिझर अगदी अनोख्या पद्धतीनं प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. त्यामुळे या चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार, याविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात आता ‘वाळवी’चे थरारक असे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे.

नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी ‘वाळवी’चे नवीन पोस्टरही झळकले. यात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे एका वेगळ्याच अंदाजात दिसत असून त्यांच्या व्यक्तिरेखा चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढवणाऱ्या आहेत. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम चित्रपट आहे.

ट्रेलरमध्ये स्वप्नील जोशी आणि अनिता दाते नवरा बायको दिसत असून ते आत्महत्या करण्याचा निर्णय घेत आहेत. मात्र हा स्वप्नीलने आखलेला डाव असून यात त्याला शिवानी मदत करत असल्याचे दिसतेय. हे सगळं होत असतानाच सुबोध त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. क्षणोक्षणी कुतूहल वाढवणारा आणि गूढ असणाऱ्या ‘वाळवी’त स्वप्नील आणि शिवानीचा मनसुबा पूर्ण होणार की, आखलेला डाव फिरणार ? सुबोधकडे असे नक्की काय गुपित आहे? वाळवीचा या सगळ्याशी काय संबंध ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला १३ जानेवारीला चित्रपटगृहात मिळणार आहेत.

 

दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणतात, ” प्रेक्षकांना काहीतरी नवीन विषय देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि यात मला झी स्टुडिओजची नेहमीच साथ लाभते. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच अप्रतिम असतो. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.

‘वाळवी’ ही एक वेगळा विषय आहे. शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा हा चित्रपट आहे. अनेक तर्कवितर्क लावत असतानाच चित्रपटातील गूढ अतिशय अनपेक्षितपणे उलगडणार आहे. कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत.’’

झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘वाळवी’ची निर्मिती केली असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. यापूर्वी झी स्टुडिओज आणि परेश मोकाशी यांनी मराठी सिनेसृष्टीला हरीशचंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि चि. व चि. सौ. का. असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे आता ‘वाळवी’ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार हे नक्की.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

उरुळी कांचन येथील डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेच्या निवडणुकीत ६४ टक्के मतदान ; राजेंद्र कांचन कि सुनिल जगताप बाजी मारणार याकडे सभासदांचे लक्ष..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.