पुणे : भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी आज सोमवारी (ता.२३) दाक्षिणात्य पद्धतीने विवाहबंधनात अडकले. त्यांचा विवाह सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर अवघ्या १०० पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.
या विवाह सोहळ्याला बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. लग्नानंतर केएल आणि अथियाने मनोरंजन आणि क्रिकेटविश्वातील मंडळींसाठी खास भव्य रिसेप्शनचं आयोजन केले आहे. यात रिसेप्शनला अनेक उद्योगपती आणि राजकारणीदेखील उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, अथिया-राहुल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सन २०१९ साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पहिले होते. त्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. नंतर त्या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर काही दिवसानंतर प्रेमात झाले. अखेर आज ते दोघे विवाहबंधनात अडकले असून नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
सुनील शेट्टी म्हणाले,” केएल राहुल हा माझा जावई नसून मुलगाच आहे. मी जरी नात्याने त्याचा सासरा असलो तरी तो माझा मुलगाच आहे. अथिया आणि केएल राहुलचे रिसेप्शन आयपीएलनंतर होणार आहे.