Indapur News : भगवानराव भरणे प्रतिष्ठान व मराठी साहित्य संस्कृती कला विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२०) ऑगस्ट रोजी अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे सातवे राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती मराठी साहित्य संस्कृती कला विकास परिषदेचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी दिली.(Indapur News)
या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी ने होणार आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सीताराम नरके हे असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन राज्याचे माजी राज्यमंत्री आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे.
या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी ने होणार आहे.(Indapur News)या संमेलनात परिसंवाद, कविसंमेलन, गझल मुशायरा व स्थानिक कवींसाठी खुला कवी कट्टा आयोजित केला आहे.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार करण्यात येणार आहे.(Indapur News)
दरम्यान, या संमेलनामध्ये राज्यातील लेखक, कवी सहभागी होणार आहेत. संमेलनामध्ये येणाऱ्यांसाठी संमेलनस्थळी राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी पत्रकारांना दिली.(Indapur News)