पुणे : सध्या देशभरात लग्नाचा माहोल असून अनेक ठिकाणी ढोल नगाडे वाजून लग्नाच्या वराती निघत आहेत. सध्या अशाच एका लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. स्वत:च्या लग्नात एक नवरी वाजंत्री बनली आहे. या लग्नाचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये नवरी तिचे लग्नाचे सर्व विधी सोडून वाजंत्र्यासोबत ढोल वाजवत आहे. नवरी व्हिडिओत तमिळनाडूतील प्रसिद्द वाद्य चेंडा वाजवते आहे. मुलीला चेंडा वाजवताना पाहून वडिल देखील तिला साथ द्यायला आले. वडिलांनंतर तिचा होणारा नवरा देखील यात सामील झाला आहे.
https://twitter.com/LHBCoach/status/1607408001488683008?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1607408001488683008%7Ctwgr%5Ee2f8145820705000cf182dc645b185424a01fbbc%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
या व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आज गुरुवायूर मंदिरात विवाह सोहळा पार पडला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच नवरीचे वडील चेंडाई मास्तर आहेत आणि नवरी मोठ्या उत्साहाने ते वाजवते आहे, मुलीला पाहून वडील देखील चेंडा वाजवायला येतात.
दरम्यान सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु झाली आहे.