मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है…’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री हिना खान ही गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. नुकतचं हिना खानने शेअर केलेली पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. हिना खानला कॅन्सरचं निदान झालं आहे. स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती अभिनेत्री हिनाने दिली आहे. याबाबत हिना खानने एक पोस्ट शेअर केली आहे.
हिना खान हिने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले की, सर्वांना हॅलो…सध्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्यावर मी सर्व चाहत्यांना सांगू इच्छिते की, मी ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. मी ठिक आहे. मी खूप जास्त शक्तीशाली आहे आणि मी लवकरच या आजारीतून बाहेर पडेल. सध्या माझ्यावर उपचार सुरू आहेत. कॅन्सरच्या लढाईत हिनाने चाहत्यांकडून पाठिंबा मागितला आहे आणि लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. माझ्या खासगी आयुष्याचा आदर राखा, असेही तिने म्हटले आहे. प्रार्थनेत लक्षात ठेवा आणि मला खूप आशीर्वाद पाठवा.
अभिनेत्री हिना खान ला अक्षरा नावाने खरी ओळख मिळाली आहे. हिना खान ही सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना हिना दिसत असते. हिना खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.